Showing posts with label marathi poems. Show all posts
Showing posts with label marathi poems. Show all posts

मैत्री

मैत्री


अनिकेत पाटिल

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो

कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात

आयुष्य म्हणजे

आयुष्य म्हणजे कटकट..
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं

आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं

आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं

आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं

पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

तुझ्या स्मरणांचे धुके

तुझ्या स्मरणांचे धुके
सतत वारा होऊन
सभोवताली सोबत करते

तुझीच मी , माझाच तू
म्हणत म्हणत
काही नवी काही जुनी
गोड गाणी गुणगुणते

कधी कधी
शब्दात माझ्या ताल शोधते
अन् कधी ...
मौनातले राग शोधते

फिरते...
भिरभिरते...
मुरते ... तसे ..
समोर येता ..
तूच कधी
...विरते ..!!

तुझ्या स्मरणांचे धुके  !!

गजानन मुळे